कांदा कापताना डोळयात पाणी का येते? | Why Cutting Onions Make you cry?

     नमस्कार मित्रांनो आज आपण कांदा कापताना डोळयात पाणी का येते? यामागच कारण जाणून घेणार आहोत. 

  कांदा कापत असतानां डोळयात पाणी येणे ही एक साधारण गोष्ट मानली जाते. यामागच कारण 90% लोकांना माहित नाही. यामागच कारण म्हणजे कांद्या मध्ये एक खास प्रकारचे इंजाईम असते. कांदा कापताना हे इंजाईम हवेत गॅस सोडते, हवेच्या माध्यमातून तो गॅस डोळ्यांच्या संपर्कात येतो. यामुळे डोळयात पाणी यायला सुरुवात होते व डोळे जळजळ करायला लागतात.

 कांद्यामध्ये असणाऱ्या त्या इंजाईम चं नाव एलीनेज आहे.ज्यामुळे डोळयात पाणी येते, जेव्हा तुम्ही कांदा कापता त्यावेळी हे इंजाईम हवेतील पाण्यात मिसळून "सिन प्रॉपनिंथीयल एस ओक्साईड" नावच एक वाष्पशील रसायन तैयार करते. ज्याला वाष्पशील कार्बनिक यौगिक पण म्हणतात. हे रसायन रूम टेम्परेचर वर भाप बनून गॅस बनते आणि डोळ्यांच्या संपर्कात आल्यावर लैक्रिमिक गैलंड ला उत्तेजित करते, ज्यामुळे डोळ्यात पाणी येते. 

 कांदा कापताना डोळयात येणाऱ्या पाण्यापासून स्वतःचा बचाव कसा करायाचा? चला जाणून घेऊया

1)कांदा नेहमी मोकळया हवा असणाऱ्या जागेवर कापवा ज्यामुळे वाष्पशील रसायन आपल्या डोळ्यांपासून दूर राहते.

2)कांदा कापायच्या अगोदर त्याला फ्रीज मध्ये ठेवा. कांदा चांगला थंड झाल्यावर कांदा कापताना वाष्पशील रसायन कमी सोडतो.

3)कांदा कापताना तोंडात थोडं पाणी ठेवून श्वास घ्यावा, ज्यामुळे वाष्पशील गॅस डोळ्यापर्यंत कमी पोहचते. ज्यामुळे डोळ्यात कमी पाणी येते.

4)पाणी कापायच्या अगोदर कांद्याला पाण्यात धुवून घेतल्यावर वाष्पशील रसायन पाण्यात मिसळते.  ज्यामुळे डोळयात पाणी कमी येते.

5)कांदा कापताना त्यावर लिंबाचा रस लावला तर कांद्यामध्ये वाष्पशील रसायन कमी बनते. ज्यामुळे कांदा कापताना डोळयात पाणी कमी येते.

6)कांदा कापताना डोळयात पाणी येऊ नये म्हणून मार्केट मध्ये चष्मा पण आला आहे. त्याचा वापर पण तुम्ही कांदा कापताना करू शकता.

यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कोणतीही समस्या असेल तर त्यावर उपाय पण असतो.

धन्यवाद

#onioncutting #कांदा #कांदा #फॅक्ट #factmarathi #knowledge
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या