आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की त्यामागे काहीतरी विज्ञान असत. त्याच पैकी अशाच एका विज्ञानाबद्दल वेगळंया प्रकारच तथ्य जाणून घेणार आहोत. आपल्या घरात कोणाला सर्दी किंवा खोकला झाल्यावर Cough Syrup म्हणजे खोकल्यावरील औषधं देण्यात येते. ते औषध छोट्या बाटलीत असते हे तुम्हाला माहित आहे. पण तुम्ही त्या बाटलीचा रंग काळा किंवा तपकिरी का असतो? यामागचं कारण जाणून घेतलं आहे का? तुम्हाला प्रश्न पडेल त्यामागे काय कारण असणार त्यांना आवडला म्हणून काळा किंवा तपकिरी रंगाची बाटली बनवली असेल. पण मित्रांनो त्यामगच कारण वेगळं आहे. तेच कारण आपण जाणून घेणार आहोत.
तुम्ही कोणत्याही मेडिकल शॉप मध्ये किंवा डॉक्टर कडे असणाऱ्यां cough सिरप च्या बाटलीचा रंग पाहिला तर तो काळा किंवा तपकिरी असा असतो. वेगवेगळ्या कंपन्याची बाटली असली तरी तिचा रंग हा काळा किंवा तापकीरी असतो. तुम्हाला प्रश्न पडेल असं का? यामागे वैज्ञानिक कारण आहे का? तर याच उत्तर म्हणजे हो आहे.
Cough Syrup च्या बाटलीचा रंग काळा किंवा तापकीरी का असतो? यामागच वैज्ञानिक कारण
कप सिरप च्या बाटलीचा रंग काळा किंवा तपकिरी असण्यामागच कारण म्हणजे कप सिरप मध्ये अशे तत्व असतात की जे प्रकाश आणि ऑक्सिजन प्रति संवेदनशील असतात. त्यामुळे बाटलीचा रंग काळा किंवा तापकीरी असल्याने ते तत्व चांगल्या प्रकारे राहून जास्त काळ टिकून राहतात. कप सिरप ची बाटली सुरक्षित औषधं पॅकी्जिंग चा हिस्सा आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षित प्रकारे ग्राहकांन पर्येंत पोहचवण्यासाठी बाटलीचा रंग काळा किंवा तापकीरी असा असतो.ज्यामुळे कप सिरप ची गुणवत्ता चांगली राहते.
कप सिरप मध्ये खूप सारे रासायनिक तत्व आहे जे प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्यांचा असर कमी होतो. त्यासोबत असे कंपाऊंड प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर रासायनिक अभिक्रिया (Photochemical Reaction) होऊ शकते. ज्यामुळे औषधाची गुणवत्ता कमी होते आणि लवकर खराब होते.
काळया आणि तपकिरी रंगाची बाटली सूर्य प्रकाशातून अल्ट्रावायलेट किरणे (UV Rays) शोषून घेतात आणि त्यामध्ये असणाऱ्यां औषधाना सुरक्षित ठेवतात. यावरून तुम्हाला बाटलीच्या रंगामागच वैज्ञानिक कारण समजलं असेल. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की विज्ञानात कोणतीही गोष्ट आवडीवर होतं नसते त्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असते.
कप सिरप मध्ये काही अशे पण घटक आढळतात जे हवेतील ऑक्सिजन च्या संपर्कात आल्यावर त्यामधील घटक ऑक्सिडेशन करू शकतात. ज्यामुळे औषधाचा रंग, चव बदलते आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. यामुळे बाटलीचा रंग आणि तिची पॅके्जिंग पूर्णपणे सुरक्षित असते.
#coughsyrupottlecolour #sciencefact #marathifact #amazingfact #interestingfacts #educationalfacts
0 टिप्पण्या