ह्युंदाई कार कंपनी ची सुरुवात कशी झाली?

  नमस्कार मित्रांनो आज आपण जगप्रसिद्ध कार कंपनी ह्युंदाई बद्दल जाणून घेणार आहोत. ह्युंदाई कंपनी च्या यशस्वी प्रवासातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे. तर चला जाणून घेऊया.

   ह्युंदाई कंपनी ची सुरुवात दक्षिण कोरिया मधील चुंग जुईन नावाच्या गरीब मुलाने केली होती. दोन वेळच्या जेवणासाठी दिवस रात्रं कष्ट करणारा हा मुलगा जीवनात मोठे मोठे स्वप्न पहायचा. ती मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतले घरातून पळून जाऊन स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पण आर्थिक समस्या व युद्धजन्य परिस्थिती मुळे खूप वेळा अपयश आले. तरीपण हार न मानता जगातील सर्वात मोठ्या कार कंपन्यापैकी एक कंपनी हुयंदाई ची स्थापना केली. जर तुम्हाला पण वाटत असेल की अपयश मलाच का येत? तर तुम्हाला ही पोस्ट पूर्ण वाचावी लागेल.

   चंग जुईन चा 1915 मध्ये एका गरीब कोरियन कुटुंबात जन्म झाला होता. त्यांचे वडील एक शेतकरी होते, त्यांच्या 7 मुलांचे पालन पोषण करण्यासाठी दिवस रात्रं शेतात काम करायचे. चंग चे स्वप्न शिक्षक बनायचं होतं, पण गरिबी मुळे शिक्षण घेणं शक्य नव्हतं. कधी कधी दोन वेळच जेवण भेटणं पण अवघड होतं. चंग जुईन लहानपणी वडिलांसोबत शेतात काम करणे. जनावरांना चारा घालणे व त्यासोबत लाकडं तोडणे. ते वडिलांसोबत कामानिमित्त शहरात जायचे तेव्हा त्यांना मोठ्या गाड्या, चांगले स्वच्छ कपडे घातलेले लोग, खाण्याचे वेगवेगळे पदार्थ हे पाहून वाटायचं की असं जीवन जगावे. 

     16 वर्षाच्या चंग जुईन ला त्याचे आईवडील शहरात एकटं जाऊ देणार नाही. तेव्हा चुंग ला एक न्यूजपेपर भेटला, ज्यामध्ये शहरात बांधकामासाठी कामगारांची गरज होती. 1932 मध्ये आईवडिलांना न सांगता घरातून शहरात जाण्यासाठी निघून गेले. तेथे जाऊन त्यांना बांधकामासाठी ठेवण्यात आले. पण काम जास्त आणि पैसे कमी भेटायचे. त्यामुळे चुंग ला वाईट वाटायचं पण यागोष्टीचा गर्व होता की जीवनात ते स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करत होते.

    चंग चं हे काम जास्त दिवस चाललं नाही कारण त्याचे आईवडील त्याला वेड्यासारखे सापडत होते. दोन महिन्यानंतर चंग त्यांना सापडला. चंग च्या आईवडिलांनी त्याला समजावून घरी नेलं. घरी आल्यावर पुन्हा पूर्वीची कामे करायला सुरुवात केली. या कामात त्यांचे मन लागत नव्हते त्याला शहराची ओढ लागली होती. त्यानंतर चंग दोन वेळा घरातून पळून गेले पण त्यांचे वडील त्याला सापडून घरी घेऊन यायचे. पण त्यानंतर पण चंग यांचा विचार बदलला नाही. ते चौथ्यादा घरातून पळून सीऊल शहरात गेले. सीऊल दक्षिण कोरियाची राजधानी आहे.

  चंग ला बांधकामत काम भेटले त्यानंतर काही दिवसांनी एका कारखान्यात काम भेटले. तेथे काम केल्यानंतर चंग ला एका तांदूळ मिल मध्ये डिलिव्हरी बॉय चं काम भेटलं. तेथे तो प्रामाणिक पणे काम करत होता. त्याची प्रामाणिकपणा पाहून राईस मिल च्या मालकाने त्याला सहा महिन्यानंतर मॅनेजर बनवल. 1937 मध्ये शॉप चा मालक आजारी पडला, त्याला शॉप चालवण शक्य नव्हतं. त्यामुळे त्याने ते शॉप चंग जुईन ला देऊन टाकलं. चंग ने चांगल्या प्रकारे शॉप चालवायला सुरुवात केली. पण काहीतरी असं घडलं की चंग ला शॉप सोडून गावाला जायला लागलं.

 दक्षिण कोरिया वर तेव्हा जपान चं राज्य होतं, जपान तेव्हा दुसरं महायुद्ध लढत होता. तेव्हा जपानीज सरकार ने सैन्याला अन्न कमी पडू नये म्हणून दक्षिण कोरिया च्या सर्व राईस शॉप ताब्यात घेतल्या. त्यापैकी एक चंग ची राईस शॉप होती. चुंग ला शॉप सोडून गावाला जायला लागलं.

 चंग ने एक वर्षानंतर कर्ज घेऊन गॅराज सुरु केले. पण त्यात आग लागली त्यानंतर कर्ज चुकवण्यासाठी पुन्हा एकदा कर्ज घेऊन मोठं गॅराज सुरु केलं. चंग कामात कष्टाळू असल्यामुळे लोकांना त्याच काम आवडायला लागलं. चंग ने तीन वर्षानंतर सर्व कर्ज फेडलं. त्यानंतर घरच्यांना समजून त्यांना शहरात घेऊन आले. पण काही दिवसानंतर जपानीज सरकार ने कामासाठी त्यांच्या गॅरंज ताब्यात घेतलं.पुन्हा एकदा चंग चे वाईट दिवस सुरु झाले. सीऊल मध्ये तणाव पाहुन चंग आपल्या कुटुंबाला घेऊन गावात राहायला गेले.

चंग कडे 50000 वोन्ग ची सेविंग होती ज्यामुळे पुन्हा एकदा व्यवसाय सुरु करण्यासाठी ते संधी शोधत होते. 1946 मध्ये दुसरं महायुद्ध संपलं त्यानंतर दक्षिण कोरिया जपान पासून स्वतंत्र झाला. चंग ने ही वेळ वाया न घालवता, सीओल शहरात जाऊन व्यवसाय सुरु केला. त्याच नाव ठेवलं ह्युंदाई मोटर्स सर्विस सुरु केली. अमेरिका चा दक्षिण कोरिया वर प्रभाव पडला. अमेरिकन आर्मी च्या ट्रक दुरुस्थिची कामे चुंग ला भेटू लागली. त्यानंतर त्याला अमेरिका बांधकामाची कामे करत होता. तेव्हा चंग ने बांधकामत असलेला अनुभव लक्षात घेऊन. ह्युंदाई सिविल सर्विस कंपनी ची स्थापना करून कामाला सुरुवात केली. चंग ला बांधकामाची अनेक कामे भेटली.

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया मध्ये युद्ध सुरु झाले. उत्तर कोरिया ने सीओल शहरावर हमला केला. चंग जीव वाचवण्यासाठी शहर सोडून गेला. अमेरिकन आर्मी ने उत्तर कोरिया ला हरवण्यासाठी दक्षिण कोरिया ची साथ दिली. सीओल शहर बर्बाद झालं होतं, त्याला पुन्हा विकसित करण्यासाठी चंग ने काम सुरु केले. तेव्हा दक्षिण कोरिया सरकार ने नियम बनवला की  विदेशी कंपनी ला दक्षिण कोरिया मध्ये कार बनवायची असेल तर लोकल लोकांसोबत मिळून काम करावं लागेल. 

चंग साठी हा नियम सुवर्ण संधी बनला त्याची ह्युंदाई मोटर्स सर्विस कंपनी गाड्या दुरुस्थिची काम करायची. चंग ने 1967 मध्ये गाड्या बनवायला सुरुवात केली.त्यासाठी ह्युंदाई मोटर्स कंपनी ची स्थापना केली. ह्या कंपनीने फोल्ड सोबत कार बनवायला ओलसन शहरात सुरुवात केली. सहा महिन्यात मोठा प्लांट उभा केला. पण 1969 मध्ये भयानक महापूर आला आणि प्लांट पाण्यात बुडाला. गुंतूवणूकदारांनी पैसे परत मागायला सुरुवात केली. कंपनी पाण्यात बुडल्यामुळे नुकसान झाल्यामुळे चंग च्या जीवनात पुन्हा वाईट दिवस आले. पण अपयशाचा सामना करणे, हे चुंग शिकला होता.

एवढ्या वाईट दिवसांचा सामना करून ह्युंदाई मार्टिना कार ला मार्केट मध्ये विकायला सुरुवात केली. यावेळी कार विकल्या गेल्या, पण ही गोष्ट फोल्ड कंपनी ला आवडली नाही.फोल्ड च्या कार विकल्या जातं नव्हत्य आणि ह्युंदाई च्या कार विकल्या जातं होत्या. यामुळे 1974 मध्ये फोल्ड ने ह्युंदाई सोबत करार मोडला. यामुळे ह्युंदाई ला खुप मोठं नुकसान झालं कारण कार बनवण्याची टेकनिक फक्त फोल्ड नां माहित होती. ह्युंदाई तिचा वापर करून कार बनवायचा. फोल्ड चा करार तुटल्यामुळे ह्युंदाई कंपनी ने नवीन पाटनर सापडायला सुरुवात केली.

चंग ने त्यावेळी सर्वात मोठ्या फॉक्स वेगन आणि जनरल मोटर ला सोबत काम करायची ऑफर दिली त्यांनी ती नाकरली. त्यानंतर जपान ची मिथिसो बीसी कंपनी ला कार बनवायची टेकनि्क शेअर करण्यासाठी ऑफर दिली. त्यांनी ही ऑफर स्वीकारली, त्यानंतर ह्युंदाई पूर्ण पणे स्वतःच्या कार बनवण्यावर लक्ष देऊ लागला. त्यासाठी ब्रिटिश कार कंपनीचा अनुभवी व्यक्ती जॉर्ज टूर्नबूल ला हायर केलं.त्याने अजून ब्रिटिश इंजिनिअर हायर केले.त्यावेळी दक्षिण कोरिया सरकारने कार कंपन्यांना पूर्णपणे मेड इन कोरिया कार बनवायला सांगितली.

 ह्युंदाई कंपनी ने ही गोष्ट लक्षात घेऊन नवीन प्लांट बनवला. सरकारच्या आदेशानुसार ह्युंदाई ने 1975 मध्ये पूर्णपणे कोरियन कार लाँच केली.त्या कारच नाव पोनि होतं, ही कार एवडी चांगली होती की 60% मार्केट तिने कंट्रोल केलं. तेव्हा चंग ने 3 लाख कार बनवायला सुरुवात केली. लोकांना त्याचा निर्णय मूर्ख पणाचा वाटला. कारण दक्षिण कोरिया मध्ये फक्त 30,000 ची मागणी होती. पण चंग ने मोठा विचार केला आणि कंपनी ला आंतराष्ट्रीय बनवण्यासाठी ब्रिटिश देशात एन्ट्री केली. ब्रिटिश देशामध्ये 2093 कार विकल्या. त्यानंतर 1984 मध्ये कॅनडियन मार्केट मध्ये एन्ट्री केली, पोनि 2 लाँच केली. कॅनडा मध्ये पण कंपनी यशस्वी झाली. त्यानंतर अमेरिका सारख्या देशात एन्ट्री करण्यासाठी नियमांच पालन करून ह्युंदाई XL लाँच केली. अमेरिका मध्ये सेकंड हॅन्ड कार विकल्या जातं आहे ते पाहून हुंदाई ने 5 वर्षाच्या वारंटी सोबत कार विकायला सुरुवात केली आणि 1 लाख पेक्षा जास्त कार विकल्या. 

हुंदाई XL कार कमी किमतीत आणि जास्त एफर्डेबल नसल्यामुळे कार ला अमेरिकेत चिप कोरियन कार बोलली जाऊ लागली. यामुळे ह्या गोष्टीतून बाहेर पडून नवीन ओळख बनवण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. 1995 मध्ये ह्युंदाई सोनाटा आणि हुंदाई XM लाँच केली. ह्या कार फुल्ली टेकनिकल असल्यामुळे मार्केट मध्ये खूप विकल्या गेल्या. ह्युंदाई एक वेगळी ओळख सुम्पूर्ण जगात भेटली. 

आजच्या काळात ह्युंदाई जगातील टॉप100 ब्रँड पैकी एक आहे. कार बनवण्याच्या बाबतीत टॉयटा, फॉक्सवेग्न   नंतर तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. जगातील 193 देशामध्ये ह्युंदाई कार कंपनी आहे. भारतात पण ह्युंदाई ने आज पर्यत लाखो कार विकल्या आहेत. इंडियन मार्केट वर पण ह्युंदाई ची चांगली पकड आहे.

धन्यवाद

#HyundaiSuccessStory #Motivation #success story #hyundai #factmarathi




  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या