बालाजी चिप्स प्रसिद्ध होण्यामागच कारण जाणून थक्क व्हाल. | Balaji Chips Marketing Tricks

  नमस्कार मित्रांनो व्यवसाय कसा करायचा आणि तो कसा चालवायचा? हा खूप मोठा प्रश्न व्यवसाय करणाऱ्या लोकांसमोर येत असतो. यावरच उत्तर म्हणजे जे व्यवसाय यशस्वी झाले आहेत. ते कशे झाले,याविषयीं जाणून घेणे. त्यामुळे आज आपण प्रसिद्ध वेपर्स कंपनी बालाजी सुरुवातीच्या दिवसात कशी यशस्वी झाली. याविषयी जाणून घेणार आहोत.

  मित्रांनो व्यवसाय करत असताना सर्वात महत्वाचा नियम म्हणजे ग्राहकांची गरज लक्षात घेणे किंवा लोकांची गरज बनने. ह्या नियमाला लक्षात घेऊन बालाजी कंपनीच्या मालकाने 25 ते 30 लोकांना कामावर घेतलं. त्यांना काम एकच होतं की किराणा दुकानात  जाऊन विचारायचं की तुमच्याकडे बालाजी वेपर्स आहे का? ते तुम्हाला दुसरं वेपर्स दाखवलं तरी बालाजी वेपर्स पाहिजे होते. हे म्हणून दुसऱ्या दुकानात जाऊन पण विचारत जायचं की बालाजी वेपर्स आहे का? तुम्हाला प्रश्न पडेल की यात काय आहे?

 बालाजी वेपर्स च्या मालकाने ही गोष्ट 15 दिवस चालू ठेवली त्यानंतर त्या दुकानात जाऊन बालाजी वेपर्स से होलसेल विक्रेते माल विकायचे. दुकानदार पण ग्राहकांची गरज लक्षात घेऊन ते विकत घेयाचे. बालाजी वेपर्स च्या मालकाने दुकानामध्ये स्वतःची जागा निर्माण केली. ज्यामुळे ग्राहकांच्या नजरेत बालाजी वेपर्स दिसलें. ग्राहकांनी ते खरेदी करून खायला सुरुवात केली. ग्राहकांना वेपर्स आवडले, ज्यामुळे बालाजी वेपर्स आज संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली.

 बालाजी वेपर्स च्या मालकाकडे कॉलीटी होती फक्त दुकानात स्वतःची जागा बनवून ग्राहकांना ते घेण्यास भाग पाडायचं होतं. लोकांची गरज लक्षात घेऊन मार्केटिंग कशी करायची हे तुम्ही बालाजी कंपनी कडून शिकू शकता.

#balajichips #balajiwepars #businesssuccessstory #successstory

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या